Breaking News

‘केजी, एलकेजी’च्या जमान्यात जि. प. शाळेलाच प्राधान्य


बेलपिंपळगाव प्रतिनिधी 

नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा आहे. या शाळेत गावातील अनेक विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. मुलांना या ठिकाणी योग्य शिक्षण मिळत आहे. सध्या इंग्लिश मिडियमला आपली मुलं असावी, अशी अनेकांची इच्छा असते. पण याला मात्र बेलपिंपळगाव येथील शाळा अपवाद आहे. गावातील ९० टक्के मुले जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकत आहेत. 

याठिकाणी मुलांना अजूनही सुविधा उपलब्ध करून त्यांचा बुध्यांक वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. बेलपिंपळगावतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पूर्णपणे डिजिटल करण्याचा गावातील माजी विद्यार्थ्यांनी संकल्प केला आहे. इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत असणारी ही शाळा डिजिटल करण्यात येणार आहे. मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी मदत होईल. गावातील सर्वसामान्य लोकांना इंग्रजी शाळेत मुलांना प्रवेश घेण्याकरता मोठी रक्कम मोजावी लागते. पण जिल्हा परिषदेच्या शाळेत हे शिक्षण मुलांना मोफत मिळत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल, अशी माजी विद्यार्थ्यांची भावना आहे. 

पूर्ण शाळा डिजिटल करण्यासाठी दोन ते अडीच लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यासाठी माजी विद्यार्थी पुढे येत आहेत. जो तो आपल्या इच्छेप्रमाणे वाटा उचलण्यास तयार आहे.