Breaking News

‘युटेक’तर्फे ऊस उत्पादकांचा मेळावा उत्साहात


आश्वी : प्रतिनिधी

संगमनेर तालुक्यातील पहिला खाजगी साखर कारखाना असलेल्या ‘युटेक शुगर’कडून तालुक्यातील जोर्वे येथे ऊस उत्पादक शेतकऱ्याना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित केलेली शेतकरी परिषद व मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध भागातील ऊस उत्पादक उपस्थित होते. सहभागी ऊस उत्पादकांच्या सहयोगाने मोठ्या हा मेळावा उत्साहात पार पडला.

यावेळी कारखान्याचे अध्यक्ष रविंद्र बिरोले, संचालक शंतनू बिरोले, शरद थोरात, एकनाथ नागरे, दादाभाऊ गुंजाळ, अँड. रामदास शेजुळ, नानासाहेब खुळे, हरिभाऊ गिते, बुवाजी खेमनर, दिलिप इंगळे, कारभारी काकड, बाळासाहेब जोर्वेकर, वसंतराव गुजाळ, दिपक थोरात आदींसह ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला कारखान्याचे अध्यक्ष रविंद्र बिरोले यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले.

यावेळी बिरोले यांनी युटेक शुगर या कारखान्याची सविस्तर माहिती दिली. कारखान्याचा सहवीजनिर्मिती प्रकल्प सुरु झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी युटेकचे बी. एन. खर्डे, ए. पी. जाधव, एस. पी. दिघे, अशोक वाघ, भाऊसाहेब मंडलिक आदींसह परिसरातून आलेले ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.