व्यापा-यास पाच लाख रुपयांचा गंडा घालणा-या राजस्थानमधून दोघांना अटक
यानुसार देसाई यांनी मध्यस्थाच्या माध्यमातून 5 लाख रुपये राजूभाई नावाच्या व्यक्तीला दिले.पैसे देवून बरेच दिवस झाले तरी ते परत न मिळाल्याने देसाई यांनी संजय जैन यांच्यांशी संपर्क साधला. जैन यांनी अशाप्रकारे कधीही पैसे मागितले नसल्याचे तसेच ते मिळाले नसल्याचे सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कमलेश थनारामजी देसाई (रा. सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास करत राजूसिंग उर्फ करणसिंग जोतीसिंग राजपुत (वय 26, रा. जालोर, राजस्थान) आणि दिपसिंग अर्जुनसिंग राठोड (वय 22, रा. जालोर) या दोघांना अटक केली.
