जमिनीच्या वादातून पिकावर रासायनिक औषध फवारून चार लाखाचे नुकसान
सातारा, दि. 20, जून - जमिनीच्या वादातून गुंडाच्या टोळीकडून शेतातील आलेल्या पिकावर रासायनिक औषध मारून पिकाचे सुमारे 4 लाख रुपयांचे नुकसान करून, शेतामध्ये अतिक्रमण करू न शिवीगाळ, दमदाटी केल्या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात सातारा शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील झंवर याच्यासह 10 ते 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झंवर यांच्यासह ज्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यामध्ये मोक्का लागलेल्या संशयित अनिल कस्तुरेचाही समावेश आहे.या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची सुनील नारायण झंवर (रा.सदरबझार), अनिल कस्तुरे, सुनील गायकवाड, राजेश कांबळे, इंद्रजित शिंदे, आशिष कांबळे अशी नावे आहेत. त्यांच्यासह त्यांच्या 10 ते 12 साथीदारांवरही गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणी विजय ज्ञानू मतकर (वय 75, रा.रामकुंड, करंजे) यांनी तक्रार दिली आहे. तक्रारदार विजय मतकर यांची करंजे येथे शेतजमीन आहे. या जमिनीवरून मतकर व संशयित झंवर यांच्यामध्ये वाद होता. तक्रारदार विजय मतकर या वादासंबंधी न्यायालयात गेले होते व न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकालही दिला आहे. असे असताना 8 सप्टेंबर 2016 रोजी तक्रारदार मतकर यांनी त्यांच्या शेतात सोयाबीन, घेवडा व उसाचे पीक लावले होेते. मात्र अज्ञातांनी रानात आलेल्या पिकावर रासायनिक फवारणी करून पिकाचे नुकसान केले. या कृत्याबाबत सुनील झंवर याच्यावर तक्रारदारांचा संशय होता. या घटनेनंतर 23 व 24 जुलै 2017 रोजी संशयित सुनील झंवर याने गुंड अनिल कस्तुरे व त्याची टोळी हाताशी धरून जमिनीवर अतिक्रमण करून कंपाउंड उखडून जेसीबीद्वारे उसाचे पीक जमीनदोनस्त करून एकूण 4 लाख रुपयांचे नुकसान केले. याशिवाय गुंडांच्या टोळीने दहशत घालून शिवीगाळ, दमदाटी केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.तक्रारदार विजय मतकर यांच्या घरी सर्वजण वृद्ध असून त्यांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. दिवाणी न्यायालयात जमिनीच्या वादाचे प्रकरण असताना त्याचा निकाल तक्रारदार यांच्या बाजूने लागलेला आहे. यातील संशयित अनिल कस्तुरे याला सध्या मोक्का लावला असून अद्याप तो पसार आहेे. या घटनेचा पुढील तपास शाहूपुरी पोलीस करत आहेे.