Breaking News

ऑनलाइन वीजबिल भरा, अतिरिक्त शुल्क टाळण्याचे आवाहन

सोलापूर, दि. 20, जून - सध्या ऑनलाइन व्यवहार करण्याकडे कल वाढत आहे. महावितरण कंपनीचे ग्राहक मासिक वीज बिले ऑनलाइन भरत आहेत. मात्र ऑनलाइन वीजबिल भरणा क रणार्‍या ग्राहकांच्या संख्येत वाढ व्हावी यासाठी आता क्रेडिट कार्डवगळता नेट बँकिंग, डिजिटल वॉलेट, कॅश कार्ड, डेबिट कार्ड, यूपीआय पद्धतीने बिल भरणार्‍यांना अतिरिक्त शुल्क न आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी या व्यवहारांवर शुल्क आकारले जात होते. ऑनलाइन पद्धतीने बिल भरण्यासाठी ुुु.ारहरवळीलेा.ळप मोबाइल अ‍ॅपद्वारे ऑनलाइन वीजबिल भरणा करता येणार आहे. केड्रिट कार्डद्वारे भरणा केल्यास ग्राहकांना शुल्क आकारण्यात येणार आहे. नेट बँकिंग, यूपीआय, डेबिट कार्ड, डिजिटल वॉलेट, कॅश कार्डने वीज देयकाचा भरणा केल्यास ग्राहकांना कुठल्याही प्रकारचा शुल्क आकारला जाणार नाही. ऑनलाइन पद्धतीने भरणा केल्यास नोंदणी केलेल्या मोबाइल क्रमांकावर एसएमएसद्वारे त्वरित पोहोच व बिल जमा झाल्याचा संदेश प्राप्त होईल. तसेच संके तस्थळावर रिूाशपीं हळीीेीूं यावर स्पर्श केल्यास भरणा, तपशील व पावतीही मिळणार आहे. ग्राहकांनी वीजबिल ऑनलाइन भरावे. यापूर्वी शुल्क आकारण्यात येत होता. आता ते आकारले जाणार नाही. याचा तालुक्यातील वीज ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन माढा महावितरण कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता आर. पी. चव्हाण यांनी केले आहे.