Breaking News

‘प्रवरा’च्या संगणक महाविद्यालयात वृक्षारोपण

प्रवरानगर प्रतिनिधी : प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील गृहविज्ञान व संगणक महाविद्यालयामध्ये जागतिक पर्यावरणदिनानिमित्त महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले, अशी माहिती प्राचार्य डॉ. शशिकांत कुचेकर यांनी दिली.

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ संचालक के. पी. नाना आहेर, शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, वनविभागाचे तालुका समन्वयक अहिरे, उपप्राचार्या डॉ. अनुश्री दुबे, राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. रुपाली कोरडे, प्रा. अर्चना घोगरे, प्रा. अनिल गागरे आदी उपस्थित होते. काशीद, नारंग रुक्मितारु आदी झाडांचा यामध्ये समावेश आहे.