Breaking News

गोगाव येथे पार पडले भव्य आरोग्य शिबिर

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आणि सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून आज गोगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत भव्य आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात गावकऱ्यांसह शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषधांचे वितरण करण्यात आले. गडचिरोली येथील शांताई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, शांताबाई श्यामराव कोडवते बहूउद्देशीय संस्था व ग्रामपंचायत गोगाव यांच्या सयुंक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शांताई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व सुप्रसिद्ध स्त्री रोगतज्ञ डॉ. नितीन कोडवते, डॉ. चंदा कोडवते यांनी नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच रीना चुधरी, उपसरपंच नंदलाल लाडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास मूनघाटे, उच्चश्रेणी मुख्याध्यापक ए. जी. फुलझेले आदी उपस्थित होते. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी राकेश तडफदार, डेबूजी पोटे, संगीता राऊत, कौशल्या टेकाम, ज्वेता करमे, भाग्यश्री लाडे आदींनी सहकार्य केले.