Breaking News

‘संजीवनी’चे चायनीज भाषा परीक्षेत यश


कोपरगांव :  येथील संजीवनी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी चीनच्या काॅन्फुसियस इन्स्टिटयूटचावतीने मुंबई येथे घेण्यात आलेल्या हॅन्यु शुईपिंग काओशी (एचएसके) या परीक्षेत घवघवीत यश मिळविले. या परीक्षेत इ. ६ वी व ७ वीचे १० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या परीक्षेत त्यांनी १०० टक्के निकाल दिला, अशी माहिती स्कुलच्या संचालिका मनाली कोल्हे यांनी दिली.
यामध्ये अर्च्यु रायन शेंडगे, अंजली कारवा, मैत्रेयी कुलकर्णी, स्वयम देवकर, संस्कृती पाटील, शिवांजली वाघ, स्तुती पटेल, समृध्दी सोणवने, चैतन्य अग्रवाल व रूतुल लोढा या विद्यार्थ्यांनी यश संपादित केले. यासाठी स्कूलच्या प्राचार्या श्रीनीला काला व सर्व शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देत आहेत, असे कोल्हे सांगितले.