जागृत सुर्यमुखी हनुमान मंदिर येथे मास पोथी पुराण उत्साहात
उक्कलगाव प्रतिनिधी - श्रीरामपुर येथील कुस्ती आखाडा स्टेडियम जवळील सुर्यमुखी हनुमान मंदिरात अधिक मास पोथी पुराण समाप्ती निमित्ताने महिला मंडळातर्फे सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या वेळी सर्व नागरिकांनी प्रसादाचा लाभ घेतला. त्या निमित्ताने मंदिर परिसर फरशी, व इतर कामाचे देणगीदारांच्या हस्त उद्घाटन झाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष सुनील डहाळे, सचिन बाकलीवाल, दीपक भांड, महाराज कंट्रोड, मोरे मावशी आदिंनी परिश्रम घेतले.