Breaking News

विद्यानिकेतन स्कूलमध्ये वृक्षारोपण


सात्रळ / प्रतिनिधी : येथील विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कुल या संस्थेत जागतिक पर्यावरणदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेच्या उपाध्याक्षा अर्चना अनाप यांच्या संकल्पनेतून शाळेच्या आवारात अनाप यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

संस्थेचे संस्थापक व राष्ट्रवादी काँग्रेस ओ बी सी चे प्रदेश चिटणीस मिलींद अनाप, सोनगांव ग्रामपंचायत सदस्य संदीप अनाप, नरेंद्र अनाप, आशिष अनाप, संदीप सिनारे, सतिष सिनारे, नामदेव अनाप आदी तसेच इतर पालक व शिक्षक वृंद व कर्मचारी उपस्थित होते.