Breaking News

‘सूर्यतेज’च्यावतीने पर्यावरणदिन उत्साहात


कोपरगाव शहर प्रतिनिधी : येथील सूर्यतेज संस्थेच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी जागतिक पर्यावरणदिनानिमित्त गोदावरी तीराजवळील लुंबीनी उपवन या बुध्दविहारात वृक्षारोपण करण्यात आले. येथे लावण्यात आलेल्या झाडांचे स्थानिक नागरिकांना पालकत्व देण्यात आले, अशी माहिती सूर्यतेजचे संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी दिली. या संस्थेच्यावतीने पर्यावरणदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सूर्यतेज संस्थेच्या वतीने कला, सांस्कृतिक, शैक्षणिक, स्वच्छता, वृक्षारोपण यासह विविध सामाजिक उपक्रम गेल्या १८ वर्षांपासून राबविण्यात येत आहे. वृक्षारोपण अभियानाच्या माध्यमातून आजपर्यंत शहर व ग्रामीण भागात सुमारे ४५ ठिकाणी फुल, फळ यासह पर्यावरणपूरक देशी-विदेशी हजारो झाडांंचे रोपण करून पालकत्व दिले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडांची वाढ होऊन जैविक विविधतेस सदुपयोग होत आहे. सूर्यतेज संस्था वनविभाग, सामाजिक वनीकरण यांच्यावतीने पर्यावरणदिनानिमित्त लुंबीनी उपवन बुध्दविहारात गुलमोहर यासह विविध झाडांचे रोपण करण्यात आले.

याप्रसंगी सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके म्हणाले, स्वच्छ व शुध्द वातावरणासाठी पर्यावरणाचा समतोल महत्वाचा आहे. वृक्षारोपण आणि पालकत्वाच्या लोकचळवळीने पर्यावरणास मोठी मदत होत आहे. नागरिकांनी पर्यावरणास हानी पोहचविणार्या प्लास्टिकचा वापर टाळून सर्वांनी लोकचळवळीत सहभागी व्हावे. कार्यक्रमास लुंबीनी उपवन बुध्दविहाराचे भन्ते अनंदसुमनसिरी, भन्ते कश्यप, नानासाहेब मोरे, अजय विघे, बबन शिंगाडे, विजय भातनकर, नितीन शिंदे, सूर्यतेजचे मिलिंद जोशी, रविंद्र भगत, समन्वयक आनंद टिळेकर, अक्षय काळे, वनपाल अनिल गावडे, अर्चना बोरसे, वनरक्षक सविता काळे, बापूसाहेब फुकटे, देवराम जाधव, डि. बी. झुंझुरडे, प्रताप दवंगे, डि. बी. सुरासे, एस. एम. लांडे आदींसह सूर्यतेज संस्थेचे प्रतिनिधी, लुंबीनी उपवन बुध्दविहाराचे पदाधिकारी, वनविभाग, सामाजिक वनीकरनचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.