Breaking News

कल्याणच्या महापौरांसमोर नाशिक शिवसैनिकांमध्ये शाब्दिक चकमक


अपघातग्रस्तांना मदत करणे हा शिवसैनिकांचा खरा पिंड.आपत्तीकाळात सर्व हेवेदावे विसरून शिवसैनिक मदतीचा एकमेव उदात्त हेतू नजरेसमोर ठेवून शिवसैनिकांचे हात राबण्याची परंपरा महाराष्ट्राला चांगली अवगत आहे.तथापी या परंपरेला नाशिक शहरातील शिवसेनेच्या एका गटाकडून खंडीत करण्याचा प्रमाद घडला. विशेष म्हणजे शिवसैनिकांनी हमरीतुमरीवर येण्याचा हा प्रमाद अपघातग्रस्तांना नाशिक जिल्हा शासकीय रूग्णालयात भेटण्यासाठी आलेल्या कल्याणच्या महापौरांसमोर घडल्याने चर्चा तर होणारच ना!
चांदवडजवळ भल्या सकाळी झालेल्या भिषण अपघातात ठार झालेले दुर्दैवी प्रवासी ना.एकनाथ शिंदे यांच्या जवळचे असल्याने ना.शिंदे यांना या अपघाताचे वृत्त समजताच त्यांनी नाशिकमधील त्यांच्या विश्‍वासू गटनेत्याला फोन करून मदत करण्यास सांगीतले.गटनेत्याने तातडीने जिल्हा रूग्णालयात धाव घेतली.शिवसेनेच्या आणखी एका नेत्याला फोन करून रूग्णालयात बोलावून घेतले. त्यानंतर कल्याणच्या महापौरांनीही थेट जिल्हा रूग्णालय गाठले.तेंव्हा हे दोन्ही स्थानिक नेते त्यांच्या सोबत होते.त्यानंतर महानगर शिवसेनेच्या काही पदाधिकार्यांनीही पायधुळ झाडून औपचारिकता पूर्ण करण्याचे औचित्य साधण्याचा प्रयत्न केला.दरम्यानच्या काळात ना.शिंदे यांनी मदतीसाठी पाठवलेल्या गटनेत्याने कल्याणच्या महापौरांना अपघातग्रस्तांच्या संदर्भात माहीती देण्याचा प्रयत्न केला.आणखी कुठे कुठे किती रूग्ण उपचार घेत आहेत,याची माहीती देत असताना महानगर पदाधिकार्याने त्यांचे बोलणे खंडीत करीत काहीही खोटी माहीती काय देतो...असे अवमानजनक शब्द वापरले.तरीही प्रसंगाचे गांभिर्य ओळखून गटनेत्याने शांततेची भुमिका घेतली.माञ महानगर पदाधिकार्यांचे टोमणे सुरूच होते.हा प्रसंग पाहणार्या काही माध्यम प्रतिनिधींच्या चाणाक्ष नजरेतून ही बाब सुटली नाही.प्रसंग समाजमाध्यमांवर व्हायरल होऊ लागल्यानंतरावर माञ संबंधितांचे अवसान गळाले आणि संदेश व्हायरल होऊ नये म्हणून धावपळ सुरू झाली.एकूणच या प्रसंगामुळे अन्य तत्वांप्रमाणे शिवसेनेचे मदतीचा हात देताना प्रसंगाचे भान ठेवण्याचे तत्वही काही मंडळींनी राजकारणाच्या बाजारात मांडले की काय ही समाजात सुरू झालेली चर्चा माञ ही मंडळी कशी रोखणार? हाच खरा रोखठोक सवाल शिवसेनेच्या अस्तित्वासमोर उभा आहे.