Breaking News

तुरीच्या अनुदानापोटी अडीचशे कोटी द्यावे लागणार

तूर उत्पादक शेतकर्‍यांनी हमीभावाने तूर खरेदीसाठी सरकारकडे नोंदणी केली होती. तरी देखील ज्यांची तूर ख
रेदी झाली नाही, अशा शेतकर्‍यांना सरकारकडून प्रतिक्विंटल 1 हजार रू पये अनुदान दिले जाणार आहे. सरकारकडे नोंदणी झालेल्या पण हमीभावाने खरेदी न झालेल्या तुरीला अंदाजे अडीचशे कोटी रुपये द्यावे लागणार आहेत, असा अंदाज आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तुरीला प्रतिक्विंटल 1 हजार रूपये अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. यानुसार ज्या शेतकर्‍यांची तूर खरेदी करायची राहिली होती. त्या शेतकर्‍यांना प्रतिक्विंटल 1 हजार रूपये अनुदान म्हणून देण्यात येणार आहेत. या अनुदानासाठी काही अटी असणार आहेत, मात्र अजूनतरी त्या अटी काय असतील हे स्पष्ट झालेले नाही.