Breaking News

टीडीएफचे प्रा. संदीप बेडसे यांना काँग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा

नाशिक/प्रतिनिधी : विधानपरिषदेच्या नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीत पंचरंगी लढत अपेक्षित असून भाजपाचा अपवाद वगळता अन्य राजकीय पक्षांनी गुरूजनांच्या संसदीय हक्क ाशी छेडछाड करण्याची परंपरा कायम राखत थेट पक्षीय राजकारण टाळले आहे. मात्र शिक्षकांच्या हक्कासाठी लढण्याची परंपरा असलेल्या टीडीएफला पाठिंबा देऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने संदीप बेडसे यांच्या पारड्यात आपले वजन टाकले आहे.दि.6 जुन रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी तर 7 जुन रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाशिक विभाग शिक्षक विधान परिषद मतदार संघातून टीडीएफची अधिकृत उमेदवारी करीत असलेले प्रा. संदीप बेडसे यांना पाठिंबा देत असल्याचा पत्र प्रसार माध्यमांना जारी केले आहे.
शिक्षण क्षेत्रात ज्ञानदान करणारे गुरूजन राजकारणाच्या प्रवाहात वाहू नये, ही सार्थ अपेक्षा ठेवून या निवडणूकीपासून राजकीय पक्षांनी अंतर ठेवण्याची परंपरा होती. तथापी विधीमंडळाच्या व रिष्ठ सभागृहात संख्याबळाचा कोरम पुर्ण करण्याच्या स्पर्धेत भाजपाने ही परंपरा यंदाच्या निवडणूकीत थेट उमेदवार उभा करून खंडीत केल्याने राजकीय मंडळींसह गुरूजनांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.