Breaking News

दलालांच्या बतावणीने शेतकर्‍यांच्या पायावर धोंडा

हरिभाऊ सोनवणे / नाशिक --- जुन्या टॅक्टरची खरेदी विक्री करणारे सर्वच दलाल फसवणूक करणारे असे नाही तर काहींच्या एव्हहार अत्यंत स्वच्छ असून अगदी ठरलेल्या वेळेत क ागदपत्रे देणारेही काही आहेत. मात्र काही बतावणी खोर दलाल थापा मार्ट वर्षे सम्पवत आहे.यात शेतकर्‍यांच्या पायावर धोंडा पडून घेत आहे. कांदा अथवा इतर पिकाचे कधी नव्हत दोन पैसे हातात आलेल्या शेतकर्‍यांची भेट घेऊन शेतीसाठी तुम्हाला ट्रॅक्टरची कशी व किती गरज आहे, यांचे महत्व पटवून जुना ट्रक्टर घेण्यासाठी दलालांकडून शेतकर्‍यांना तयार करण्यात येते . एकदा ट्रक्टर विकून पैसा हातात आला की दलालांचा कार्यभार सम्पतो अशी भावना दलालांनी करून घेतली आहे. खरे तर ट्रॅक्टरचे कागदपत्रं देण्याची जबाबदारी दलालांची असते. या प्रकरणात अनेक शेतकर्‍यांनी आपल्या पायावर धोंडा पाडून घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वास्तविक ट्रक्टर दलालांना दलाली करताना आधार असायला हवा यात नाडला गेलेल्या शेतकर्‍यांना पेक्षा दलाल खरे अशी भूमिका दिसून येते . शेती साठी ट्रक्टर उपयुक्त च आहे ट्रक्टर घेण्यासाठी सर्वच शेतकरी तयार असतात असेही नाही, काहींची तयारी असते तर काही दलालावर त्यांच्या गोड बतावणी वर विश्‍वास ठेवून फसतात ,वास्तविक जुने वाहन खरेदी व्यवहारात दीड ते दोन टक्के कमिशन दलालांचे असते. त्यातही समोरचा दलाल खात्रीचा तसेच कागदपत्रे मिळवून देणारा असेल तर त्याला दीड टक्का द्यायला हरकत नाहीं, मात्र अशा एव्हरात अनाधिकृत दलालांचा सुळसुळाट वाढला असून त्यामुळे शेतकर्‍यांना पायावर धोंडा पाडून घ्यावा लागत आहे, शासनाच्या योजनेत ट्रक्टर घेन्यासाठी अधिकारी ऑनलाईन मध्ये टेबलाखालून पैसे खात असल्याने सामान्य शेतकर्‍यांना या दलालावर विश्‍वास ठेवावा लागत आहे. यातूनच शेतकर्‍यांची मोठी फसवणूक होत आहे. दलालांचे उप दलाल असून हे उप दलाल जवळच्या नातेवाईकांचा घात करीत आहे मोठ्या दलालांकडून जुन्या ट्रॅक्टरची ठराविक किंमत क रून तो ट्रक्टर 25 ते 50 हजार रुपये अधीक किंमत सांगून शेतकर्‍यांना लुबडण्याचा प्रकार या प्रकरणातून समोर आला आहे. काही उप दलाल नातेवाईकना फसवीत असून कागदपत्रांचे टेन्शन घेऊ नका महिनाभरात कागदपत्रे मिळतील असे पोकळ आश्‍वासन देऊन हे उप दलाल नातेवाईकांना ठरलेली रक्कम देण्यास भाग पडतात.या बतावणी खोर दलालाना आता आपलाच हिसका दाखवायला हवा असा सूर शेतकरी राजाच्या चर्चेतून ऐकायला मिळत आहे ,दलालांचे उपदलाल या प्रकारची फसवणूक करीत असल्याचा प्रकार समोर आला असून या प्रकाराची व्याप्ती मोठी आहे महाराष्ट्रच न्हवे तर यूपी एमपी गुजरात केरळ अशा अन्य राज्यातून ट्रक्टर खरेदी विक्री करण्यात येत आहे.