Breaking News

दहावीच्या विद्यार्थ्यांना आज निकालाची उत्सुकता

मुंबई - दहावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याची विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे. मार्च 2018 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याबद्दल पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता. अखेर महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज शुक्रवारी जाहीर करण्यात येणार आहे. मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी माहिती देताना सांगितले की शुक्रवारी सकाळी 11 वाजता निकाल जाहीर करण्यात येणार आहे. व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक, ट्विटर आणि अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून दहावीच्या निकालाच्या तारखेबाबत चुकीची माहिती प्रसिद्ध करण्यात येत होती. अखेर महामंडळामार्फत यावर पूर्णविराम देण्यात आला असून दहावीच्या परीक्षेचे निक ाल उद्या जाहीर करण्यात येतील, असे मंडळाने स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांना हीींिं://ारहीर्शीीश्रीं.पळल.ळप या संकेतस्थळावर त्यांचा सविस्तर निकाल पाहयला मिळेल. तर एसएमएस सेवेद्वारेही निकाल पाहता येणार आहे. यासाठी 57766 या नंबरवर चकडडउीरिलशीशरीं पे असा एसएमएस करायचा आहे.
दहावीच्या परीक्षेला यंदा 17 लाख 36 हजाराहून अधिक विद्यार्थी बसले होते. दहावीची लेखी परीक्षा 1 मार्चपासून ते 17 मार्चपर्यंत या कालावधीत घेण्यात आली होती. दहावीच्या लेखी परीक्षेला बसलेल्या बहुतांश विद्यार्थ्यांनी कलचाचणीत सहभाग घेतला होता. त्याचा निकाल मागील महिन्यात लागला आहे.