Breaking News

शिरेगावात ग्रामस्थांनकडुन कृषी कन्यांचे स्वागत

पानेगाव (प्रतिनिधी ) - नेवासा तालुक्यातील शिरेगाव येथे कृषी महाविद्यालय सोनईच्या कृषी कन्यांचे ग्रामस्थांनकडुन स्वागत करण्यात आले . यावेळी सरपंच भारती पवार, उपसरपंच निरंजन होन, प्रगतशिल शेतकरी दिगंबर जाधव , ग्रामसेविका कविता दांगट यांनी पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले. कृषीकन्या सोनाली आंधळे हिने सांगितले की, कृषी पदवीच्या अभ्यासक्रमाआंर्तंगत ग्रामीण कृषी कार्यानुभवासाठी कृषी महाविद्यालय सोनई अंतीम वर्षामध्ये शेतकऱ्यांना माती परीक्षण, जनावरांचे लसीकरण, पाणी व्यवस्थापन, फळ बाग लागवड, बिज प्रक्रिया सेंद्रिय तसेच एकात्मिक शेती विषयक माहिती तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याकरीता प्रात्यक्षिकांचे चर्चासत्र आयोजित करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले. यावेळी प्रगतशिल शेतकरी कुशाराम जाधव यांनी सांगितले की शेतकऱ्यांसाठी नवनवीन तंत्रज्ञान , पाणी व्यवस्थापन, माती परीक्षण खताची मात्रा यासाठी निश्चितच कृषी कन्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल असा अशावाद यावेळी बोलताना व्यक्त केला. यावेळी कृषी कन्या दिपाली दहिफळे, शारदा दातीर, कावेरी गोसावी, प्रियंका बांगर, श्रावण गिडा , सोनाली आंधळे आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते.