Breaking News

भातकुडगाव चौफुला विकासाचा कात टाकतोय

आर . आर. माने , भातकुडगाव- शेवगाव नेवासा राज्यमार्ग क्रमांक ४४ वरील शेवगावच्या पश्चिमेकडील बाजूस १४ किलोमीटर अंतरावर भातकूडगाव फाटा चौफुला आहे. गेल्या चार दशकांपूर्वी या फाट्यावर दहशतीचे वातावरण असायचे त्यामध्ये स्व. एकनाथ आढाव यांचे छोटे चहाचे दुकान होते . तर भातकुडगाव येथील वारकरी संप्रदायातील नजन यांची पाणपोई होती. तद्नंतर भातकूडगाव फाटा चौफुलाने हळूहळू विकासाची कात टाकत आज दिवस - रात्र माणसाने चौफुला गजबजलेला दिसत आहे. गेल्या काही वर्षापूर्वी बाळासाहेब काळे यांनी परिसरातील शेतीला जोडून असणाऱ्या दूध धंदा या व्यवसायाची नस ओळखून या चौफुल्यावर बजरंगबली दूध संकलन संस्था चालू करून परिसरातील अनेक तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. आता चौफुल्यावर मोठ मोठाली किराणा दुकान व उत्तम जेवण देणारी हॉटेल . शेती उद्योगाशी निगडित अशा वस्तूंचे छोटी मोठी दुकाने, दवाखाने, कापूस खरेदी केंद्र, पेट्रोल पंप, मंगल कार्यालय, ग्रामीण पत्रकारांचे संपर्क कार्यालय, पतसंस्था, बांधकाम क्षेत्रातील वस्तूसाठी लागणारी दुकाने, इलेक्ट्रॉनिक्स- इलेक्ट्रिकल्स दुकाने, औषधी दुकाने, टेलरिंग केटर्स, सलून, छोटे-मोठे फळविक्रेते, भेळ सेंटर, छोटी मोठी वजन काटे, मिनरल वॉटरचे दुकाने, मोटरसायकल शोरूम, इंजिनीअरिंग वर्कशॉप, व्यापारी संकुल, साखर कारखान्यांची संपर्क कार्यालय, ऑटोमोबाईल दुकाने, सायबर कॅफे,औषधी दुकाने अशा विविध क्षेत्रातील व्यवसायांची चौफुल्यावर रेलचेल झाली आहे. त्यात बेलापूर-परळी रेल्वे मार्ग चौफुला लगत असल्याने भविष्यात या चौफुला व्यवसायिक अंगाने भरच मिळणार आहे.

चार दशकांपूर्वी भातकुडगाव चौफुल्यावर दुपारी ४ नंतर माणसांची गर्दी ओसरू भातकुडगाव चौफुला ओस पडत असेल त्यामुळे या चौफुल्यावर नेहमीच दहशतीचे वातावरण असायचे भविष्यात असे हे कदाचित त्याकाळी बोलणे म्हणजे सांगा सांगी वडाला वांगी असे झाले असते परंतु शेवगाव नेवासा राजमार्ग व जवळच तालुक्याचे ठिकाण तसेच परिसरातील २० ते ३० गावांना जोडणारी पंचक्रोशीतील नागरिकांची वर्दळ असते. जवळच स्वयंभू गणपती देवस्थान आव्हाने, स्वयंभू काळेश्वर देवस्थान गुंफा, नवनाथ बाबा देवस्थान भायगाव व नव्याने 'क' प्रवर्गामध्ये समावेश झालेले जगदंबा देवस्थान देवस्थान भाविनिमगाव असल्याने या भाविकांची वर्दळ या ठिकाणी असते. येथील काही व्यवसायिक याच ठिकाणी स्थायिक झाल्याने या परिसरात भीतीचे वातावरण संपुष्टात आले आहे.
चौकट _
भातकुडगाव चौफुल्यावर विविध व्यावसायिकाकडून भातकुडगाव ग्रामपंचायतीला कर रूपात मोठा महसूल मिळत असल्याने भातकुडगाव ग्रामपंचायतीने पूर्णवेळ पिण्याच्या पाण्याची सुविधा भातकुडगाव चौफुलीवर पाणीपुरवठा करावा. स्वतंत्र बसस्थानकाची सोय करावी. पोलिस आउटपोस्ट या ठिकाणी कार्यान्वित करावे अशी मागणी व्यावसायिकाकडून होत आहे. तसेच शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींना तसेच व्यावसायिकांना संरक्षण मिळेल अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक करत आहेत