कोल्हेंच्या वाढदिवशी आपत्ती निवारण पथकाचे उदघाटन
कोपरगाव प्रतिनिधी
संजीवनी उदयोग समुहाचे अध्यक्ष आणि साईबाबा संस्थानचे विश्वस्त बिपीन कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून [दि. २१] येथील हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते आपत्ती निवारण पथकाचे उदघाटन करण्यात येणार आहे.
याप्रसंगी माजीमंत्री शंकरराव कोल्हे, आ. स्नेहलता कोल्हे आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. कोल्हे हे त्यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करीत असतात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार-तुरे, शाल, पुष्पगुच्छ, सत्कार सोहळयाला फाटा देत शालेय साहित्य ते वाटत असतात. कार्यकर्त्यांनीदेखील सत्कारासाठी अनावश्यक खर्च टाळून त्या खर्चात शालेय साहित्य भेट देऊन कोल्हे यांचा सत्कार करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आपत्तीग्रस्त व्यक्तींना वाचविण्यासाठी कोल्हे यांनी स्वतः हा कक्ष स्थापन केला आहे. या व्यक्तींना आवश्यक ते मार्गदर्शन देऊन तसेच यातील अधिका-यांना प्रशिक्षित करून विशेष काम केले आहे. कोपरगांव महापूर आपत्तीत तसेच मायगांवदेवी मंदिरावर अडकलेल्या भाविकांची विशेष हेलिकाॅप्टरच्या सहाय्याने सुटका केली होती. यासाठी संजीवनीच्या आपत्ती निवारण पथकाने विशेष मदत केली आहे. हे पथक अधिकाधिक अत्याधुनिक पध्दतीने निर्माण करण्यासाठी कोल्हे यांनी भर दिला. जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन संजीवनी उदयोग समुहाच्यावतींने करण्यात आले.
