Breaking News

विखेंच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप


आश्वी : प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रूक येथे राज्याचे विधानसभा विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद सदस्या अँड. रोहिनी निघुते यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले आहे. 

यावेळी पोलिस निरिक्षक अनिल कटके, ज्येष्ठ कार्यकर्ते माधवराव गायकवाड, मुख्याध्यपक श्रीमती जाधव, मुख्याध्यापक दस्तगीर शेख आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण ब्राम्हणे यांनी केले.