Breaking News

कोल्हापूर-कराड मार्गावर झटकरे फाट्यावर अपघात; तीन ठार

कोल्हापूर - कराड मार्गावरील झटकरे फाट्यावर झाडाला चारचाकी धडकल्याने तीन जण ठार झाल्याची घटना घडली आहे. तर, या भीषण अपघातात दोन जखमी झाले आहेत. जखमींना इस्लामपूरच्या आधार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. गाडीमध्ये पाच जण होते. हे सर्वजण कोल्हापूरहून पुण्याकडे जात होते. याच दरम्यान हा अपघात झाला.