Breaking News

ठाण्यात रस्ते अपघातात युवतीचा मृत्यू


ठाणे - ठाण्याच्या घोडबंदर रोडवर झालेल्या रस्ते अपघातात एका 22 वर्षीय युवतीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रियांका झेंडे असे अपघातात मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे. प्रियांका ही तिची मैत्रीण संघवी बोकाडे हिच्यासोबत घोडबंदर रोडवर दुचाकी घेऊन गेली होती. तिथून परतत असताना नागला चौक ी भागात मुसळधार पावसामुळे गाडी चालवणार्‍या संघवीला समोरचा टँकर दिसला नाही आणि गाडी घसरुन मागे बसलेली प्रियांका थेट टँकरखाली आली. तिच्या डोक्यावरून टँकरच चाक गेल्याने तिचा मृत्यू झाला. संघवीने हेल्मेट घातल्यामुळे तिला कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र मागे बसलेल्या प्रियांकाचा जागीच मृत्यू झाला.