Breaking News

उद्याचा नागरिक घडविण्याचा निर्धार : डॉ. विखे


लोणी/ प्रतिनिधी : लोकनेते पद्मभूषण डाॅ. बाळासाहेब विखे यांनी मांडलेल्या शिक्षणाच्या विचाराला अनुसरून इंटरनॅशनल स्कूलची वाटचाल सुरू आहे. शैक्षणिक उपक्रमातून गुणवंत्त विद्यार्थ्यी आणि उद्याचा नागरिक घडविण्याचा आमचा संकल्प आहे, असा निर्धार डाॅ. सुजय विखे यांनी व्यक्त केला.

राहाता येथील डाॅ. बाळासाहेब विखे पाटील इंटरनॅशनल स्कूलच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या पालक शिक्षक मेळाव्यात ते बोलत होते. डाॅ. विखे म्हणाले, या परिसराची गरज ओळखून या स्कूलची स्थापना करण्यात आली. शाळेचा दर्जा आणि गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी संस्थाचालक म्हणून घेत असलेल्या निर्णयाची माहिती यावेळी त्यांनी दिली. ते पुढे म्हणाले, शिक्षणात स्पर्धा वाढत असली तरी आम्ही आमचे वेगळेपण गुणवत्तेतून टिकवून ठेवणार आहोत. शाळेसाठी परिपूर्ण अशी इमारत आहेच. पण आवश्यक असलेले शिक्षकदेखील उपलब्ध आहेत. विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये अतिशय कमी कालावधीत विश्वास निर्माण करू शकलो. पालकांच्या मिळणार्‍या प्रतिसादावरून आम्ही या स्कूलचा विश्वास सार्थ ठरविला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबद्दलचा विचार खासदार साहेबांनी सातत्याने मांडला. तोच विचार पुढे घेऊन जाण्याचे काम या स्कूलमधून होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी स्कूलच्या प्राचार्या स्मिशा कुट्टी, डायरेक्टर डॉ. बी. के. सलालकार, आय. टी. आय. कॉलेजचे प्राचार्य एस. सी. दंडवते, समन्वयक राहुल विखे आदींसह पालक आणि शिक्षक उपस्थित होते.