Breaking News

वाहतूक व्यवस्थापकपदाला राज्यसरकारने मान्यता द्यावी - काँग्रेस


पुणे - पुणे महापालिकेच्या मोटार वाहन विभागाकडील वाहनांची संख्या अंदाजे 1 हजार 187 वाहने आहेत. त्यामुळे या वाहनावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक व्यवस्थापक पदाची निर्मीती करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थापकपदाला राज्यसरकारने मान्यता द्यावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे. महापालिकेने वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी 2014-15 मध्ये वाहतूक व्यवस्थापक या पदाची निर्मिती केली आहे. त्याला स्थायी मार्फत सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. यापूर्वी पालिका प्रशासनाने जानेवारी 2010 मध्ये हा प्रस्ताव पाठविला होता. मात्र वाहतूक व्यवस्थापक पदाबाबत आक्षेपांची पूर्तता व माहिती राज्यसरकारने मागविली आहे. त्याची पूर्तता संबंधित मोटार वाहन विभागाने केलेली आहे. त्यामुळे आता तरी वाहतूक व्यवस्थापक पदाबाबतचा प्रस्ताव कार्यालयाकडून तातडीने राज्यसरकारला पाठविण्यात यावा अशी मागणी काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केली आहे.