स्थलांतरीत रोहिंग्यांची स्थिती हृदयद्रावक : प्रियांका चोप्रा
मुंबई - जागतिक निर्वासित दिनानिमित्त बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ट्विटरवरून स्थलांतरीत रोहिंग्याच्या मुलांनी शेअर केलेल्या कथा ऐकून हृदयद्रावक कहाणी असल्याचे म्हटले आहे. या वर्षी स्थलांतरीत रोहिंग्यांच्या एका तळाला (कॅम्प) तिने भेट दिली होती. तिथे भेट दिल्यानंतर तिला दिसलेल्या विदारक परिस्थितीची माहिती प्रियांकाने शेअर केली आहे. युनिसेफने यासाठी राजदूत म्हणून निवडल्यास त्यांच्या हक्कासाठी प्रयत्न करण्याची तिची इच्छा आहे.