Breaking News

700 जणांना भूमध्य सागरात जलसमाधी

इटली, दि. 31 - बोटींच्या साहाय्याने यूरोपमध्ये येऊ पाहात असलेल्या येथील भूमध्य सागरात 700 च्या वर विस्थापितांना जलसमाधी मिळाली असल्याची भीती  युनायटेड नेशन्सने व्यक्त केली आहे. या सुमद्रात बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार या तिन्ही दिवशी 3 बोटी बुडाल्या आहेत.
अनेक जण या 3 दुर्घटनांत मिळून बेपत्ता झाले आहेत. या तिन्ही घटनांत मिळून जवळपास 700 जण मृत झाले असल्याचे युनायटेड नेशन्सने म्हटले आहे.  सापडलेले मृतदेह आणि प्रत्यक्षातील मृतांचा आकडा यात मोठी तफावत असू शकेल. मृतांचा संख्याही 700 च्यावर असेल, अशी भीती युनायटेड नेशन्सने व्यक्त  केली आहे.बुधवारी तस्करांची बोट उलटून किमान 100 जण बुडाले. यातील काही जणांनी आपला प्राण वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना इटालियन  नौदलाच्या अधिका-यांनी बोटीवर येण्यास मनाई केली. काही लोक बोटीवर चढण्याचा प्रयत्न करीत होते, त्यांना बोटीबाहेर फेकण्यात आले.
गुरुवारी दुसरी बोट उलटून किमान 550 लोकांचा मृत्यू झाला. गुरुवारी ही बोट उलटल्यानंतर त्यातील कोणत्याही निर्वासितांचा थांगपत्ता लागलेला नाही. या  बोटीमध्ये किमान 670 लोक असल्याचे सांगण्यात आले. या बोटीला इंजिनसुद्धा नव्हते. दुस-या बोटीला ही बोट जोडण्यात आल्याचे वाचलेल्या लोकांनी  आपल्याला सांगितल्याचे त्यांनी म्हटले.
शुक्रवारी घडलेल्या अपघातात 135 लोकांना वाचविण्यात आले तर 45 जणांचे मृतदेह सापडले. मात्र किती जण अद्याप बेपत्ता आहेत याची अधिकृतपणे माहिती  नाही. हे निर्वासित इटलीच्या किना-यावर पोहोचल्यानंतर समुद्रात उलटलेल्या बोटींचा भयानक अनुभव पोलिसांना तसेच संयुक्त राष्ट्राच्या कार्यकत्र्यांना सांगतात,  असे त्यांनी सांगितले.सोमालिया, इरिटिड्ढया आणि सुदान येथून हे नागरिक यूरोपमध्ये येण्याचा प्रयत्न करीत होते. सोमालियात सध्या मोठा संघर्ष सुरू असून  ‘आयएसआयएस’ ची सोमालियातील शाखा अल शबादने थैमान घातले आहे तर इरिटिड्ढया येथे लष्करानेच धुमाकूळ घातला आहे. इटालीच्या नाविक दलाने  प्रयत्नांची शिकस्त करून अनेकांना वाचविण्याचे प्रयत्न केले.