Breaking News

अल्पवयीन मुलीचा विनयभंग


संगमनेर :  तालुक्यातील कुरण गावात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. याप्रकरणी अल्पवयीन मुलासह त्याच्या मामावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कुरणमध्ये राहणारा अल्पवयीन मुलगा गावातीलच एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीस त्रास देत होता. याबाबत वाच्यता केल्यास तुझ्या आई-वडीलांना पोलिसांच्या ताब्यात देईल, अशी धमकीही त्याने सदर मुलीस दिली. आरोपीचा मामा आयुब शेख याने पिडीत मुलीच्या आई-वडीलांना मुलीचे लग्न भाच्याशी लावून द्या. ‘नाहीतर दोन-तीन दिवसात दाखवतो’, अशी धमकी दिली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकरसिंग राजपूत करीत आहेत.