मुख्य आर्थिक सल्लागार पदावरून अरविंद सुब्रमण्यन पायउतार
नवी दिल्ली - देशाच्या आर्थिक धोरणांवर अभ्यासपूर्ण मांडणी करणारे अरविंद सुब्रमण्यन मुख्य आर्थिक सल्लागार पदावरून पाय उतार झाले आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्वतः फेसबुकवर एका पोस्टच्या माध्यमातून ही माहिती दिली. जेटली यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये सुब्रमण्यन यांच्या या निर्णयामागे कौटुंबिक कारण असल्याचे म्हटले आहे. जेटली म्हणाले, की काही दिवसांपूर्वी मुख्य आर्थिक सल्लागार सुब्रमण्यन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे माझ्याशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी मला कौटुंबिक कारणांमुळे संयुक्त राष्ट्रात परत जाणार असल्याचे म्हटले. त्यांची कारणे व्यक्तीगत असून अत्यंत महत्वाची आहेत. त्यांनी मला त्यासाठी परवानगी देण्या शिवाय दुसरा कोणताही पर्याय ठेवला नाही.भारतीय अर्थव्यवस्थेतील सुब्रमण्यन यांच्या योगदानासाठी जेटली यांनी त्यांचे आभार मानले आहे. सुब्रमण्यन यांची 16 ऑक्टोबर 2014 ला 3 वर्षांसाठी मुख्य आ र्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर 2017 ला जेटली यांनी त्यांना आणखी काळ काम करण्याची विनंती केली होती. त्यानंतर सुब्रमण्यन यांनी 1 वर्षाची मुदतवाढ स्विकारली होती.
