शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी सरकार प्रयत्नशील : मोदी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शेतकर्यांशी संवाद साधला. वर्ष 2022 पर्यंत शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे, यासाठी सरकार प्रयत्न क रत असल्याचे ते म्हणाले. आम्हाला आमच्या शेतकर्यांवर विश्वास आहे. उत्पन्न वाढवण्याकरता आम्ही आवश्यक ती मदत देत आहोत, असेही मोदी म्हणाले. आधी खतासाठी मोठ्यामोठ्या रांगा असायच्या. पण आता शेतकर्यांना सहज खत उपलब्ध होते. आज शेतकर्यांसाठी नीम कोटींग युरिया देशात उपलब्ध आहे, असे मोदी म्हणाले.
