‘प्रवरे’चे प्रवेश समुपदेशन केंद्र कार्यान्वित
प्रवरानगर प्रतिनिधी
राज्यातील चार कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या कृषी व कृषी संलग्नित व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षासाठीची सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया दि. ११ जून २०१८ पासून सुरु झाली आहे. या प्रवेश प्रक्रिया सदर्भातील विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी प्रवरेच्या कृषी व कृषी संलग्न महाविद्यालयात समुदेशन केंद्र सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. ऋषिकेश औताडे यांनी दिली.
ते म्हणाले, यावर्षी प्रथमच कृषी संलग्नित व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया सी. ई. टी. व बारावीच्या गुणावर प्रवेश निश्चित होणार आहे. प्रवरेमध्ये सुरु झालेल्या या केंद्रातून ऑनलाईन अर्ज भरणे, संकेस्थळावर अचूक माहिती नोंदविणे, कागतपत्रांची पूर्तता, महाविद्यालय पर्याय भरणे, प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक व संस्था स्तरावरील प्रवेश या विषयी मार्गर्शन करण्यात येत आहे. या बाबींसाठी या केंद्रामध्ये विनामूल्य इंटनेट सुविधेसह संगणक उपलब्ध करून दिले आहेत. तसेच प्रवेश फॉर्म भरण्यासाठी लागणाऱ्या माहिती पुस्तकाची प्रत पालकांना उपलब्ध करून देण्यात आली केली आहे. या सुविधा केंद्राचा फायदा सर्व पालकांनी घ्यावा, असे आवाहन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. निलेश दळे यांनी केले.
