Breaking News

रमजाननिमित्त मुस्लिम बांधवाना कपडे वाटप


राहुरी ता. प्रतिनिधी
येथील चैतन्य कृषी विकास प्रतिष्ठानच्यावतीने राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचा वाढदिवस आणि व रमजान इडचे औचित्य साधून देवळाली प्रवरा व राहुरी कारखाना परिसरातील गरजू व गरिब मुस्लिम कुटुंबाना कपडे आणि साड्या वाटप करण्यात आले.

देवळाली प्रवरा शहरातील ईदगाह मैदान येथे पार पडलेल्या कार्यक्रमास चैतन्य उद्योग समुहाचे अध्यक्ष गणेश भांड यांच्या संकल्पनेतून विखे यांच्या वाढदिवस आणि रमजान सणाचे औचित्य साधून हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला.

यावेळी कॉंग्रेस तालुका उपाध्यक्ष राजेंद्र लोंढे, वैभव गिरमे, नगरसेवक शैलेंद्र कदम, अनंत कदम, प्रदीप गरड, महेश सूर्यवंशी, अरफान शेख, पंचकमिटी अध्यक्ष बन्सी शेख, गणी बागवान, मुनीर शेख, मौलाना लतीफ, नीलेश कराळे, शिवसेना बीडचे जिल्हाउपप्रमुख गणेश उगले, बीड जिल्हा कॉंग्रेस उपाध्यक्ष अशोक हिंगे, सरपंच ज्ञानेश्वर शिंदे, श्रीकांत जाधव, हसन सय्यद, सौरभ घोलप, सुधा कदम, पोलिस उपनिरीक्षक अन्सार शेख, चैतन्य मिनरल वॉटर प्रकल्प चेअरमन संदीप भांड, आरपीआय जिल्हा युवक आघाडी अध्यक्ष रितेश एडके, अर्जुन शेटे, मधुकर पुजारी, भास्कर बडधे, विलास भालेराव, संजय शिंदे, गौरव भांड, सुमेध भांड, प्राचार्या वीणा दळवी आदींसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.