संदीप बक्षी आयसीआयसीआयचे नवे प्रमुख चंदा कोचर यांना दणका
मुंबई : चंदा कोचर यांच्या जागी आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुखपदी संदीप बक्षी यांच्या नियुक्ती करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. कोचर यांना सुट्टीवर पाठवण्यात आलंय. त्यांच्या सक्तीच्या रजेत वाढ करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. आयसीआयसीआय बँकेच्या संचालक मंडळाची बैठक सुरू आहे. व्हिडिओकॉनला दिलेल्या कर्जाबाबत कोचर यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती बी एन श्रीकृष्ण यांच्या नियुक्तीवर मोहोर उमटवणयाची शक्यता आहे.
आयसीआयसीआय बँकेमार्फत 2012मध्ये व्हिडिओकॉनला 3,250 कोटी रूपयांचे कर्ज दिले गेले होते. या प्रकरणी तसेच, या कर्जाप्रकरणी चंदा कोचर यांचे पती दीपक यांच्या संदिग्ध भूमिकेशी संबंधीत आहे. प्रसारमाध्यमांतील माहितीनुसार, आयसीआयसीआय बँकेसह बँक समुहाकडून कर्ज मिळाल्यानंतर व्हिडिओकॉनचे चेअरमन वेणुगोपाल धूत यांनी कथित रूपात न्यूपावर रिन्युएबल्समध्ये 64 कोटी रूपयांची गुंतवणूक केली. दरम्यान, या कंपनीला धूत यांनी दीपक कोचर आणि दोन अन्य नातेवाईकांच्या माध्यमातून उभे केले. असाही आरोप आहे की, आयसीआयसीआयने बँकेकडून कर्ज मिळाल्यानंतर 6 महिन्यांनी धूत यांनी कपनीचे हक्क दीपक क ोचर यांच्या एका ट्रस्टला 9 लाख रूपयांमध्ये ट्रन्सफर केले.
