Breaking News

कार्यालयात आंदोलन कसे करता? दिल्ली उच्च न्यायालयाचा केजरीवाल यांना सवाल

नवी दिल्ली : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या धरणे आंदोलनावर अद्यापही तोडगा निघू शकलेला नाही.
नायब राज्यपालांच्या निवासस्थानी सुरु असलेल्या या आंदोलनावरून आता दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना झापले आहे. तुम्ही तुमचे आंदोलन एखाद्या घरात किंवा कार्यालयात कसे काय करू शकता? तुमचे आंदोलन सुरु करण्यापूर्वी तुम्ही नायब राज्यपालांची परवानगी घेतली होती का? असा सवाल उच्च न्यायालयाने केला. 

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची प्रकृती उपोषणादरम्यान खालावली असून तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. आयएएस अधिकार्‍यांनी पुकारलेल्या संपाविरोधात मुख्यमंत्री केजरीवाल आणि सहकारी मंत्र्यांनी उपोषण सुरू केले आहे. केंद्र सरकार आपल्या अधिकाराचा गैरवापर करत असल्याच्या आरोप करत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मुख्यमंत्री केजरीवाल आपल्या सहकारी मंत्र्यांसह नायब राज्यपालांच्या कार्यालयात ठाण मांडून आहेत. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, मंत्री गोपाल राय व सत्येंद्र जैन हे आंदोलनात सहभागी आहेत. चार महिन्यांपासून कामे अडवून ठेवणार्‍या आयएएस अधिकार्‍यांना संप मागे घेण्याचे आदेश देण्यात यावे, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. मुख्यमंत्री केजरीवाल आपल्या सहकारी मंत्र्यांसह नायब राज्यपालांच्या कार्यालयात ठाण मांडून आहेत. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, मंत्री गोपाल राय व सत्येंद्र जैन हे आंदोलनात सहभागी आहेत. चार महिन्यांपासून  कामे अडवून ठेवणार्‍या आयएएस अधिकार्‍यांना संप मागे घेण्याचे आदेश देण्यात यावे, ही त्यांची प्रमुख मागणी आहे.