Breaking News

विकासकामांतून जनतेशी नाळ जोडली जाते - झावरे

सुपा / प्रतिनिधी । 
पारनेर तालुक्यातील वासुंदे येथील बोकनवाडी येथे पाणी योजनेचे उद्घाटन जि.प.चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्या हस्ते करण्यात आले. 
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्‍न सुजित झावरे यांनी मार्गी लागला, ही पाणी योजना होण्यासाठी ग्रामस्थांनी मागणी केली होती, यासाठी सुजित झावरे यांनी जिल्हा परिषदेमध्ये पाठपुरावा करून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत पाणीपुरवठा देखभाल दुरुस्तीअंतर्गत बोकनकवाडी येथील पाणी योजनेसाठी दहा लाख रुपये मंजूर करून घेतले.
या उद्घाटनप्रसंगी सुजित झावरे म्हणाले की, नेता जनतेने म्हटले पाहिजे, स्वतः म्हणून उपयोग नाही. तालुक्यात सध्या फ्लेक्स वाढदिवस या संस्कृतीद्वारे तरुणाई चंगळवादाकडे झेपावत आहे. यातून जनतेचे भले काय होणार, त्यापेक्षा तालुक्यातील तरुणांनी आपल्या गावाचा विकास कसा साध्य करता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. बोकनकवाडी पाणीप्रश्‍न सुटल्याने महिला व वस्तीतील ग्रामस्थांना आनंद झाला, त्यांनी सुजित झावरे यांचे आभार मानले.
यावेळी दिलीप पाटोळे, महादू भालेकर, रवींद्र झावरे, पोपट साळुंके, बाळासाहेब झावरे, शिवाजी टोपले, खंडू टोपले, विठ्ठल झावरे, संदेश झावरे, सदा झावरे, बाळासाहेब टोपले, अलंकार कडनर, मिरचंद जाधव, अशोक भालेकर, मारुती टोपले, अनिल कडनर तसेच बोकनकवाडी परिसरातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.