Breaking News

गोपिनाथ मुंडे यांची पुण्यतिथी साजरी

देशाचे नेते माजी उपमुख्यमंत्री गोपिनाथ मुंडे यांनी इतर मागासवर्गीय समाजाच्या प्रलंबित प्रश्‍नांची सोडवणुक करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, अशा शब्दांत आ. स्नेहलता कोल्हे यांनी श्रध्दांजली अर्पन केली.
कोपरगाव शहर व तालुका भारतीय जनता पक्षाच्यावतींने तसेच विविध संघटनांच्यावतींने स्व. गोपिनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले, याप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष संजय सातभाई व शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास जाधव, माजी गटनेते डॉ. अजेय गर्जे, पराग संधान, शरद थोरात, कैलास खैरे, नगरसेवक स्वप्नील निखाडे, विवेक सोनवणे, बाळासाहेब आढाव हाशमभाई पटेल, लक्ष्मण साबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
आ. स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की, स्व. गोपिनाथ मुंडे यांनी इतर मागासवर्गीय समाजाला एकत्रीत करून, त्यांचे प्रश्‍न जाणून घेवून त्यांची सोडवणूक करण्यांसाठी राज्य व केंद्र शासनांकडून सातत्यांने प्रयत्न केले. त्यांच्या कन्या व राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनीही वडीलांच्या पावलांवर पाऊल टाकत त्यांचा आदर्श घेवून, सामाजिक कार्यात कार्यरत आहेत. स्व. गोपिनाथ मुंडे यांच्या विचारांची दिशा तरूणाईने घेवून त्यांची अधुरी स्वप्ने पुर्ण करावीत असेही त्या म्हणाल्या. कोपरगाव शहरात स्व. गोपिनाथ मुंडे यांचे स्मारक व्हावे अशी मागणी मीरा गर्जे यांनी करून आभार मानले.