कृतिशील समाज सुधारकांची आज खर्या अर्थाने गरज : नसिरुद्दीन शाह
पुणे : हमीद दलवाई यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे दुर्लक्षित राहिलेले कृतिशील समाज सुधारकांची आज खर्या अर्थाने गरज आहे. त्यांच्या कार्याचा आवाका बघून मी दंग राहिलो असे मत हिंदी चित्रपट सृष्टीचे ज्येष्ठ कलाकार नसिरुद्दीन शाह यांनी व्यक्त केले.मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक आणि मुस्लिम समाज सुधारक हमीद दलवाई यांच्या जीवनावर आधारित ’हमीद : द अनसीन ह्यूमनिस्ट’ या माहितीपटाचे स्क्रिनिंग एनएफएआय येथे नसिरुद्दीन शाह, या माहितीपटाचे दिग्दर्शक ज्योती सुभाऊ यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी शाह बोलत होते. यावेळी बाबा आढाव, श्रीराम लागू, अमृता सुभाष, हमीद दाभोलकर, गिरीश कुलकर्णी, सह दिग्दर्शक ओंकार बर्वे, राजन अन्वर, शमशुद्दीन तांबोळी तसेच या माहितीपटासाठी मेहनत घेतलेले अनेक कलाकार, सहाय्यक उपस्थित होते. शहा म्हणाले, ट्रिपल तलाक सर्वोच्च न्यायालायने असंविधानिक ठरवले हे हमीद दलवाई यांच्या कार्याचे ते यश आहे. हमीद दलवाई यांनी पहिल्यांदा सात घटस्फोटित मुस्लिम महिलांना घेऊन मंत्रालयावर ऐतिहासिक मोर्चा काढून ट्रिपल तलाक विरोधात आवाज उठवला, त्याला आता पन्नास वर्षांनी यश मिळाले आहे. यावरूनच ते किती महान होते हे समजते. हमीद दलवाई यांचे मुस्लिम समाजातील सुधारणांसाठी केलेले योगदान नाकारता येणार नाही. परंतु त्यांच्या कामाची माहिती आज खूप कमी लोकांना आहे. ते आज लोक ांपर्यंत जाण्याची गरज आहे. मला जेव्हा या व्यक्तीच काम ज्योती सुभाष यांच्याकडून समजले तेव्हा मी दंग राहिलो होतो.
