नीतीश कुमारांना सोबत घेण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न
पटना : काँग्रेसने पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री नीतीश कुमार यांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न सुरु केला आहे. काँग्रेसने नीतीश कुमारांशी चर्चा क रण्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेस आपल्याकडून एक प्रस्ताव दिला की जर ते भाजपची साथ सोडतील तर काँग्रेससह इतर पक्ष त्यांना पाठिंबा देण्यासाठी विचार करु शकतात. काँग्रेसच्या खासदार रंजीत रंजन यांनी म्हटलं की, नीतीश कुमार यांच्याबाबतचं बिहारच्या प्रभारीचं वक्तव्य महत्त्वाचं आहे. डबल इंजिनचं सरकार बनली तर बिहारचं कायापालट होईल असं त्यांना वाटलं होतं पण तसं काहीच झालं नाही. काँग्रेस नेता शकील अहमद खान यांनी इशारा दिला आहे की, नीतीश कुमार यांच्यासोबत चर्चा सुरु झाली आहे.
