Breaking News

हत्याकांडांची लवकरात लवकर छडा लावण्याची मागणी


पुणे : गौरी लंकेश, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि प्रा. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येसाठी एकाच शस्त्राचा वापर करण्यात आल्याचेही एसआयटीने म्हटले आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर राज्याचे गृहमंत्री हे स्वतः मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्यावर भूमिकेवर यांच्यातून प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे त्यांनी प्रकरणामध्ये वयक्तिक लक्ष घालून यातील मारेकरी पकडावेत अशी मागणी हमीद दाभोलकर यांनी केली आहे. गौरी लंकेश हत्येप्रकरणी कर्नाटक एसआयटीने आरोपींना अटक केली आहे. त्यातील पाच आरोपी महाराष्ट्रातील आहेत. गौरी लंकेश यांच्यासह कलबुर्गी आणि पानसरे या तिघांच्या हत्येसाठी एकाच पिस्तुलाचा वापर केला आहे. त्यावरून या कट अ तिशय शांत डोक्याने केला गेल्याचे स्पष्ट होते.  त्यामुळे याची पाळंमुळं सरकारने खोदून काढावीत अशी अपेक्षा हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केली.5 सप्टेंबर 2017 रोजी गौरी लंकेश यांची बंगळुरू येथे गोळ्या घालून हत्या झाली होती. एसआयटीच्या सुत्रांनुसार, गौरी लंकेश यांची हत्या केल्याची कबूली परशुराम वाघमारेने दिली आहे. तसेच याबाबत आपण महाराष्ट्र पोलीस तपास यंत्रणेशी बोलतोय. पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात शेवटचा सहावा संशयित परशुराम वाघमारेचा ताबा मिळवण्यासाठी महाराष्ट्र एसआयटीने प्रयत्न सुरू आहे. त्याच्याशी बोलून या हत्येचा लवकरात लवकर छडा लावण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.