संभाजी ब्रिगेडच्या पारनेर तालुकाध्यक्षपदी सचिन काकडे
सुपा / प्रतिनिधी । 21 ः
अहमदनगर येथील मराठा मंगलकार्यालय येथे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकारणीची निवड करण्यात आली. यावेळी बाबुर्डी ता. पारनेर येथील सचिन काकडे यांची पारनेर तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभ खेडकर, जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी काकडे यांना निवडीचे पत्र दिले.
यावेळी सोमनाथ नवले, डॉ. संदीप कडलग, राजेश सरकाळे, सुदाम कोरडे, अनिल देठे, प्रशांत औटी, शशिकांत देठे, प्रविण भोर, ज्ञानदेव जगताप, दादा ठोकळ, रामदास नगरे, रमाकांत गाडेकर, दादा दानवे, अतिश साबळे, देवा दिवटे, सिद्धार्थ गाडगे, शरद काकडे, हर्षल जगताप, राहुल आल्हाट, गोविंद नगरे आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी काकडे म्हणाले वरिष्ठांनी टाकलेल्या विश्वासास तडा न जावू देता, पुढील काळात युवकांचे संघटन करणार असून, संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून गोर गरिब व मागासवर्गीयांसाठी शासनाच्या योजना तळागळापर्यंत पोहचविण्याचे काम करणार आहोत, शेतीमालाचे बाजारभाव असो या दुधदरवाढीसह शेतकर्यांचे विविध प्रश्न शासन दरबारी पोहोचविणार आहे. यावेळी जिल्ह्यातील संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संदिप कडलग यांनी तर, सोमनाथ नवले यांनी आभार मानले.