Breaking News

अपयशाने खचून न जाता जोमाने स्पर्धेसाठी सज्ज व्हा : शेलार


शहरटाकळी / प्रतिनिधी
यशस्वी विद्यार्थ्यांनी यशाने हुरळून न जाता गुणवत्ता सातत्याने टिकवून ठेवावी. अपयशाने खचून न जाता नव्या जोमाने स्पर्धेला सज्ज व्हावे असे मत प्राचार्य गणपत शेलार यांनी व्यक्त केले.
शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी विद्यालयात इयत्ता 10 वी व 12 वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून प्रा. शेलार बोलत होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून, शहरटाकळीच्या सरपंच अलका शिंदे, सेवा सोसायटीचे चेअरमन अनिल मडके, भाजपा जिल्हा सरचिटणीस वाय.डी.कोल्हे, उपसरपंच रवींद्र लोढे, रावसाहेब गवळी, पत्रकार रवींद्र मडके, सुभाष वाघमारे, भीमराज ठोंबळ, हरिराम मगर मान्यवर उपस्थित होते.
सेवा संस्थेचे चेअरमन अनिल मडके यांनी स्पर्धेच्या युगात आजही ग्रीन भागातील विद्यार्थी सरस असल्याचे, सांगून दहीगावने केंद्रात प्रथम येण्याची व उत्कृष्ट निकालाची विद्यालायची परंपरा कायम असल्याने, शिक्षकांचेदेखील आभार मानले. यावेळी दिगंबर पवार व ईश्‍वर वाबळे यांनीही मनोगत व्यक्त केले. 12 वी विज्ञान शाखेतील ताके स्नेहल, प्रदीप राऊत, यशदा राजेंद्र, जरे शारदा मुरलीधर, कला शाखेतील ठोंबळ रेणुका भीमराज, ठोंबळ प्रियंका बाळासाहेब, सामृत मोनाली संजय, तसेच 10 वी केंद्रात प्रथम काळे अक्षय बाबासाहेब, गवळी युवराज संजय, ठोंबळ वैष्णवी बाळासाहेब तसेच उत्तेजनार्थ यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक रामकिसन धुमाळ यांनी तर सूत्रसंचालन सुरेश तेलोरे यांनी केले. आभार सर्जेराव निकाळजे यांनी मानले.