दक्ष पोलीस मित्र संस्थेच्या वतीने हेल्मेट जनजागृती रॅली
बालाजी देडगाव ( प्रतिनिधी ) - दक्ष पोलीस मित्र सामाजिक संस्था व पोलीस डिपार्टमेंट यांच्या संयुक्त विद्यमानाने मोटार वाहन चालवताना हेल्मेटचे फायदे व हेल्मेट वापराविषयी जनजागृती करण्यासाठी नेवासा पोलीस स्टेशन ते शेवगाव पोलीस उपअधीक्षक कार्यालयापर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले . या रॅलीला सकाळी अकरा वाजता नेवासा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक माळी, गुप्तचरचे बाळासाहेब घोगरे, संस्थापक अध्यक्ष शहादेव मुंगसे, रामनाथ कोळपे, पंडीत मुंगसे यांच्या प्रमुख उपस्थित या रॅलीला झेंडा दाखवण्यात आला . ही रॅली नेवासा फाटा - भानसहिवरा- भेंडा- कुकाणा - तेलकुडगाव फाटा- जोहरापुर- मार्गाने शेवगाव उपअधीक्षक कार्यालय येथे पोहचली . या रॅलीचे उपविभागीय पोलीस कार्यालयातील हेड कॉन्स्टेेबल आव्हाड, पोलीस कर्मचारी नाईक, महिला जिल्हा अध्यक्ष रेशमाताई चांडक, विधी आधिकारी कुंजर मँडम, पोलीस काँन्स्टेबल कुसारे, लिपिक कर्मचारी कांबळे, महिला कर्मचारी मुंगसे यांनी स्वागत केले. त्यानंतर संस्थापक अध्यक्ष शहादेव मुंगसे, महिला जिल्हा अध्यक्ष रेशमाताई चांडक,रामनाथ कोळपे, पंडीत मुगंसे यांच्या हस्ते हेल्मेट जनजागृतीचे कार्यालयातील कर्मचार्यांना पत्रक वाटप करण्यात आले .या पत्रकामध्ये हेल्मेटने पुर्णपणे चेहरा झाकलेला असल्यामुळे अपघातातुन बचाव होतो . हेल्मेटची समोरची काच चांगली गुणवत्ता पुर्ण असली पाहिजे, हेल्मेटचा रंग सर्वसाधारण असला पाहिजे हा या रॅलीचे उद्देश होता. या रॅलीमध्ये पुरुष बरोबर महिलाही सहभागी झाल्या होत्या. यामध्ये रवींद्र भणगे, सोमनाथ वाघमारे, पांडुरंग मोरे, बाळासाहेब भवार , माऊली थडग, उत्तम ससाणे, ज्ञानेश्वर धायगुडे, उत्तम ससाणे , तिलोद चव्हाण, कुसुम ससाणे, सुविता काशीद, सुरेखा खरचण, साखरबाई ससाणे, लक्ष्मी खरचण, रेखा माहुलीकर, रूपाली बहिरवार आदी या रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या.