Breaking News

‘प्रवरा’च्या विद्यार्थ्यांना नोकरी


प्रवरानगर : प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील आकाश पवार आणि गौरव चिंचोरे या विद्यार्थ्यांना एंकोरे हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीत नोकरी मिळाली, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील निर्मळ यांनी दिली.
ते म्हणाले, पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांच्या ३१ मे रोजी झालेल्या इंटरव्ह्यूद्वारे या कंपनीच्या प्रोडक्टशन आणि क्वालिटी अशुरन्स या विभागात निवड झाली आहे. अंतिम वर्षाचा परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वी आत्तापर्यंत ६० पैकी २९ विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली आहे. यासाठी या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट विभागाचे प्रमुख एम. एच. कोल्हे व त्यांचे सहकारी टी. पी. डुक्रे यांचे मार्गदर्शन लाभले. या संस्थेचे अध्यक्ष व राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, जिल्हा परीषद अध्यक्षा शालिनी विखे, डॉ. सुजय विखे, संस्थेचे महासंचालक डॉ. सर्जेराव निमसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, डॉ. अशोक कोल्हे, डॉ. हरिभाऊ आहेर तसेच शिक्षकांनी अभिनंदन केले.