विद्यार्थी वाहतूक दरात 100 रुपयांनी वाढ
सोलापूर - सोलापूर शहर व जिल्हा विद्यार्थी वाहतूक कृती समितीच्या वतीने विद्यार्थी वाहतूक होणार्या वाहनांचे दर ठरवण्यात आले आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत या दरात 100 रुपयांनी वाढ करण्यात आली. ऑटोरिक्षासाठी 0 ते 2 किमीपर्यंत प्रतिमहा एका विद्यार्थ्यासाठी 800 रुपयांचे दर ठरवण्यात आले. स्कूलबससाठी 0 ते 2 किमीपर्यंत 1000 रुपये दर आकारण्यात येणार आहेे. 2 किमीपेक्षा जास्त अंतर असेल तर प्रत्येक किमीसाठी 100 रुपये अतिरिक्त भाडे द्यावे लागणार आहे. कृती समितीची दमाणीनगर येथील शिवप्रकाश विद्यार्थी वाहतूक संघटनेच्या क ार्यालयात बैठक झाली. यावेळी सोलापुरातील सर्व विद्यार्थी वाहतूक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. गेल्या काही महिन्यांपासून डिझेलचे वाढत जाणारे दर, विमा, कर तसेच पासिंग फीमध्ये झालेली वाढ आदी कारणामुळे यंदा दरात 100 रुपयांची वाढ करित असल्याचे कृती समितीचे अध्यक्ष संतोष जाधव यांनी सांगितले. हे दरपत्रक जून 18 ते मे 19 पर्यंत असणार आहे. सोलापुरात 550 स्कूल बस व सुमारे 2 हजार रिक्षांतून शालेय विद्यार्थी वाहतूक होते. या सर्व रिक्षांना हे दरपत्रक लागू असणार आहे.