पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभागाची गरज
कुळधरण / प्रतिनिधी - सजीवांच्या जीवनावर परिणाम करणारी भोवतालची परिस्थिती पर्यावरण संज्ञेत अंतर्भूत आहे. निसर्गत:च अस्तित्वात असलेल्या घटकांचा वापर आपण व इतर सजीव आपल्या पालन पोषणाकरिता वापर करीत असतात. त्या सर्व घटकांचा मानवी जीवनावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या परिणाम होतो.
मानवाने आपले जीवन समृद्ध करण्यासाठी उपलब्ध नैसर्गिक साधनांचा वापर करुन आपले जीवन समृद्ध करण्यासाठी नैसर्गिक पर्यावरणात अनेक बदल केले. त्याचा परिणाम म्हणून पर्यावरणाचा र्हास होत आहे. पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असुन, त्यासाठी लोकजागृती व लोकसहभागाची गरज आहे.
वाहतुकीसाठी रस्ते, राहण्यासाठी घरे, शेती, धरणे अशा अनेक घटकांची निर्मिती केली. त्या घटकांचा परिणाम पर्यावरणावर होताना दिसत आहे. पर्यावरणाचा दिवसेंदिवस होत जाणारा र्हास व त्याचे सजीव सृष्टी व मानवी जीवनावर होणारे परिणाम आज आपल्याला अनुभवायला मिळत आहेत. आपल्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी पर्यावरणातील विविध घटकांचा वापर केला जात आहे. मात्र पर्यावरण संवर्धनाकरीता आपल्याकडून तितकेसे प्रयत्न होताना दिसत नाहीत.
पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करणे मानव जातीस नव्हे तर, सर्व सजीव सृष्टीस अत्यावश्यक आहे. विविध कारणांमुळे गेल्या काही दशकात त्यात बरेच हानीकारक बदल होऊ लागले आहेत. वाढती लोकसंख्या, शहरीकरण, उद्योगधंदे आणि जंगलाचा र्हास यामुळे उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीत घट होत आहे. हवा, पाणी व जमीन यांच्या प्रदूषणाचा प्रश्न वाढत चालला आहे. बेरोजगारीवर मात करण्यासाठी जंगलतोडीचा पर्याय शोधला जात आहे. त्यामुळे पर्यावरणाचा अधिकच र्हास होत आहे. कारखान्यातून बाहेर पडणारा धूर व स्वयंचलित वाहनातून पेट्रोल, डीझेल जाळण्याने निर्माण होणारे दुषित वायू व काजळी यामुळे हवा प्रदूषित होत आहे. उद्योगधंदे व शहराच्या सांडपाण्यामुळे जमिनीवरील नदी, तलाव यांचे पाणी दूषित होते. शिवाय जमिनीखाली असणार्या पाण्याचेही प्रदूषण होत आहे. शेतीसाठी पाण्याबरोबर वापरली जाणारी रासायनिक खते पाण्याच्या प्रदूषणास कारणीभूत आहेत. शिवाय शेतीसाठी अतिरिक्त पाणी वापरल्याने जमिनीत क्षार वाढून मीठ फुटण्याचे व जमीन नापीक होण्याचे प्रमाण वाढले आहे.
नदीच्या पट्ट्यात हे अधिक पहावयास मिळत आहे. कर्जत, दौंड, भिगवण आदी भागात ही समस्या वाढल्याचे शेतकरी सांगत आहेत. माणसांच्या गरजा वाढल्यामुळे त्यांच्या विकासाचा वेगही त्यानुसार वाढविण्याची धडपड सर्वत्र चालली आहे. पर्यावरणामध्ये उपलब्ध असलेल्या घटकांचा वापर मानवाने आपल्याबरोबरच इतर सजीव घटकांचा विचार करुन केल्यास पर्यावरणाचा समतोल बिघडणार नाही. पर्यावरणातील प्रत्येक सजीव घटकाचे संवर्धन करणे ही आपली एक सामाजिक जबाबदारी आहे. जनजागृती म्हणून आपण प्रत्येकाने सहभागी होऊन अथवा पर्यावरण सामाजिक संस्थामध्ये सहभागी होऊन आपले कर्तव्य पार पाडल्यास पर्यावरणाचे संरक्षण होण्यास मदत होईल. मानव इतर सजीवांपेक्षा बुद्धीमान असला तरी, तो सुद्धा पर्यावरणाचाच एक घटक आहे. नैसर्गिक पर्यावरणात बदल घडवण्याची क्षमता केवळ मानवाकडे आहे. त्यामुळे पर्यावरणातील प्रत्येक घटकांचे संरक्षण करणे, त्यांचा काळजीपूर्वक वापर करणे मानवाचे आद्यकर्तव्य आहे. पर्यावरणाचे रक्षण म्हणून प्रत्येकाने वृक्ष लागवड करुन त्याचे संवर्धन करावे. इतरांनाही प्रोत्साहित करावे ही काळाची गरज आहे.शाळा, महाविद्यालयात विविध पर्यावरणीय उपक्रमांच्या आयोजनातुन विद्यार्थ्यांत पर्यावरणप्रेम वाढीस लागेल व सामाजिक संदेश दिला जाईल.