भैय्यूजी महाराज यांच्यासारख्या सेवाभावी वृत्तीचा अंत झाल्याने देशाची हानी - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे
सामाजिक व अध्यात्मिक व राष्ट्रीय दृष्टिकोन असणार्या भैय्यूजी महाराज यांच्या जाण्याने, देशाची व राष्ट्राची मोठी हानी झाली असून, भैय्यूजी महाराज यांनी नेहमी सामाजिक दृष्टिकोन ठेवून राष्ट्राची सेवा करण्याचे काम केले, सेवेचे व्रत घेवून काम करणार्या या सामाजिक कार्यकर्त्यांची देशाला गरज होती असे सांगत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली. तसेच अण्णांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले. दिल्लीतील आंदोलन संपावे म्हणून, विलासराव देशमुख यांच्याबरोबर त्यांनी प्रयत्न केल्याचे सांगत, पर्यावरण वाचवण्यासाठी ते आग्रही असत. ते आत्महत्या करतील यावर, माझा विश्वास बसत नाही. अशा या तळमळीचा कार्यकर्ता जाण्याने समाज व देशाची हानी झाली असून, ती भरून येणे अवघड असल्याचे यावेळी अण्णांनी सांगितले.
-ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे
अण्णा हजारे आणि भैय्यूजी महाराज
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि भैय्यूजी महाराज यांच्यात एक गुरु-शिष्याचे नाते होते. महाराज नेहमी अण्णा हजारे यांच्याकडून सामाजिक कामांबाबत मार्गदर्शन घेत. त्यांनी अण्णांना आपले सामाजिक गुरु मानले होते. राळेगण सिद्धीप्रमाणे देशातील इतर खेड्यांचा विकास व्हावा म्हणून, त्यांनी अनेक राज्यात जलसंधारणाची कामे केली. महाराज जेंव्हा कधी पारनेरला येत तेंव्हा राळेगण सिद्धी येथे येऊन, अण्णांच्या तब्येतीची विचारपूस करीत तर, 2011 साली दिल्ली येथील आंदोलनात दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आग्रहास्तव सरकार व अण्णा हजारे यांच्यात यशस्वी मध्यस्थी भैय्यूजी महाराजांनी केली होती.