मिरजगाव येथील भारत विद्यालयाच्या यशाची परंपरा कायम
येथील भारत विद्यालयाची इयत्ता दहावीच्या निकाल 94 टक्के लागला असुन, या वर्षीही विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले आहे. या विद्यालयाचा शेखर दादासाहेब खिळे 93.60 टक्के गुण मिळवून प्रथम आला तर, आरती शोभाचंद गवारे हीने 90.60 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर, तेजल बावडकर हा 88 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केले. भारत विद्यालयाने उत्तम यशाची परंपरा याहीवर्षी कायम राखली आहे. तर मिरजगाव येथील भाऊसाहेब झरकर माध्यमिक आश्रम शाळेचा इयत्ता 10 वीचा 100 टक्के निकाल लागला असुन, शिंदे विशाल शंकर हा 89.80 टक्के गुण मिळवून प्रथम, तर जाधव विक्रम विजय 75.60 टक्के गुण मिळवून द्वितीय, तर गायकवाड संदीप आण्णा 74.20 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे. तर नूतन माध्यमिक विद्यालयाची आलिशा जुबेर आतार ही 95.20 टक्के गुण मिळवून मिरजगाव विभागात पहिली आली आहे. तर प्राजक्ता मोहन गवारे हीने 94.40 गुण मिळवून यश संपादित केले. तिच्या या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक वर्ग शिक्षकांसह कर्जत पंचायत समितीचे उपसभापती प्रशांत बुध्दीवंत, मिरजगांवचे सरपंच नितीन खेतमाळस, ग्रामविकास अधिकारी शरद कवडे, ग्रा.पं.सदस्य लहुजी वतारे, प्रहार संघटनेचे राजेंद्र गोरे, सामाजिक कार्यकर्ते सलिम आतार, सादिक शेख, दत्तात्रय तनपुरे, सुनिल बावडकर यांनी दहावीच्या गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे आभिनंदन करून त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.