Breaking News

निमगाव खलू येथे जंबो जूगार अड्ड्यावर छापा


श्रीगोंदा : तालुक्यातील निमगाव खलू येथे सुरू असलेल्या, जंबो जूगार अड्ड्यावर काल सायं 4 वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या सूचनेनुसार पो.उप.नि. महावीर जाधव, पो. ना. शिरसाठ, पो.हे.कॉ दहिफळे, पो.कॉ. किरण बोराडे, दादा टाके, उत्तम राऊत, अमोल कोतकर, संजय कोतकर, अमोल शिंदे, विकास वैराळ, कोपनर, आजबे, रवी जाधव, किरण जाधव, केशव व्हरकटे, दुधाडे, दंदाडे या पोलीस पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून जूगार खेळणार्‍या 22 जणांसह 1 लाख, 66 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू असणार्‍या या जंबो जूगार अड्ड्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईची सर्वत्र चर्चा रंगली. 

याबाबत माहिती अशी की, आज दुपारी श्रीगोंदा पो.नि पोवार यांना श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खलु येथील हॉटेल सनलाईटच्या मागच्या बाजूस पत्र्याच्या शेडच्या आडोशाला अनेक लोक जूगार खेळत असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. त्यानुसार पोवार यांनी तातडीने पंधरा पोलिसांचे पथक तयार करून, सदर ठिकाणी पाठवले, हे पथक त्याठिकाणी गेले असता, त्याठिकाणी वीस ते बावीस जण जुगार खेळत असल्याचे त्यांना आढळून आले. पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्यांना पकडले, यावेळी जुगार खेळणार्‍या 22 जणांना पोलिसांनी ताब्यात घेत, त्यांच्याकडून 25, 700 रु रोख रक्कम, दोन दुचाकी, 19 मोबाईल यासह ऐकून 1 लाख, 66 हजार, 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

या घटनेबाबत पो.कॉ. किरण भापकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजी सर्जेराव भोसले, बापू पोपट भंडलकर, शिवाजी नामदेव शिंदे, किशोर राजू शिंदे, रघुनाथ महादू शिंदे, सुरेश बजरंग परदेशी, नाना राजू परदेशी, दीपक सुभाष कातोरे, संजय बाबुराव महाडिक, गणेश विषवनाथ भोसले, किशोर सुभाष जगताप, संतोष मधुकर शिंदे, निवृत्ती भगवान शिंदे, महादेव रामचंद्र सुतार, राजेंद्र जगन्नाथ सोनवणे, संदीप ज्ञानदेव लोखंडे, शरद बबन साळुंके, दीपक विजय शिंदे (सर्व रा. निमगावखलू ता श्रीगोंदा), नंदू संजय परदेशी, राजू शंकर जोगदंड, साईनाथ अशोक थोरात, दीपक विजय शिंदे, आकाश खंडू पुजारी (रा. दौंड) या सर्वांविरोधात श्रीगोंदा पोलिस ठाण्यात मुंबई जूगार कायदा कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे.