Breaking News

शिर्डीत बी. एस. एन. एल. लॅंडलाईन फोनला घरघर! हजारांच्या आतच ग्राहक संख्या



शिर्डी / किशोर पाटणी

शहरात भारत संचारनिगमची ५ टॉवर आहेत तर ग्रामीण भागात ११ गावात टॉवर उभारले आहेत. सध्या शिर्डी आणि राहाता तालुक्यात ३ जी सेवा कार्यान्वित आहे. लवकरच ५ जी सेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न असून राहाता शहरात टी. व्ही. चॅनलवरून ब्रॉडबॅंड कनेक्शन सेवा सुरुवात करण्यात आली आहे. ५० ग्राहकांना कनेक्शन दिले आहे. लवकरच शिर्डी शहरात ते देण्यासाठी प्राधान्यक्रम राहील, अशी माहिती बी. एस. एन. एल.चे विभागीय अभियंता हरिश्चंद्र गवारे यांनी दिली. 

मात्र दुसरीकडे वाढते मोबाईल, विविध कंपन्यांची स्पर्धा, घरात प्रत्येक सदस्याकडे मोबाईल आहेत. त्यामुळे घरातील लॅंडलाईन फोनवर सहसा कोणीही अवलंबून राहत नाही. व्यक्तिकेंद्रित संवाद महत्वाचा बनल्यामुळे मोठ्या प्रमाणावर ग्राहक कमी झाले आहेत. राहाता तालुक्यासह ग्रामीण भागात ७५० तर शिर्डीत ३५० ग्राहक आज ही टिकून आहेत. ग्राहक कमी झाले तरी मोबाईल सीम व भारत संचारची सेवा घेणारे ग्राहक आज ही वाढत आहेत. 

दूरसंचारमध्ये मोठी क्रांती झाली आणि सेवा देण्यासाठी अनेक कंपन्या पुढे आल्या. ग्राहक मिळविण्यासाठी व तो टिकून ठेण्यासाठी विविध योजना या कंपन्यांनी ग्राहकांना दिल्या.