धनगरवाडी येथ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात
सोनई प्रतिनिधी - सोनई जवळील धनगरवाडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 293 वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली . यावेळी अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त धनगरवाडी येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे उदघाटन मुळा सहकारी साखर कारखान्याचे संचालक कारभारी डफाळ यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी सदस्य सुनीलराव विरकर होते . यावेळी विष्णू महाराज पिठोरे, दैनिक लोकमंथन चे उपसंपादक बाळासाहेब शेटे, पत्रकार अशोक भुसारी, अहिल्यादेवी सोसायटीचे चेरमन जालिंदर विरकर व संचालक मंडळ, बाबासाहेब गावडे, रावसाहेब नाचणं, हरिभाऊ ढाले, विजय डोईफोडे, भाऊसाहेब दातीर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी युवकांना मार्गदर्शन करताना सुनील विरकर म्हणाले की अहिल्यादेवी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन युवकांनी कार्य करावे. अहिल्यादेवी होळकर या एक आदर्शवत स्त्री होऊन गेल्या. त्या उत्तम प्रशासक होत्या. यावेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक धनगरवाडी येथून निघून सोनई गावात आली. त्यामध्ये युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निखिल वीरकर, प्रकाश डोईफोडे, नितीन नाचणं, बबन वीरकर, भाऊराव वीरकर, भाऊराव दातीर, पोपट वीरकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.