Breaking News

पद्मश्री विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना चार विषयात पैकीच्या पैकी गुण

प्रवरानगर दि. 31 मे - लोणी येथील पद्मश्री विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा एच.एच.सी बोर्डाच्या परीक्षेच्या विज्ञान शाखेचा निकाल 97. 80 टक्के इतका लागला असुन अवधूत जाधव, कोमल गोरे आणि मंगेश मगर विद्यार्थ्यांनी चार विषयात पैकीच्या पैकी गुण मिळविले असल्याची माहिती प्रचार्य दिगंबर खर्डे यांनी दिली. 
यामध्ये विज्ञान शाखेचा अवधूत जाधव या विद्यार्थ्याने भौतिकशास्त्र आणि गणितमध्ये 100 पैकी 100 गुण मिळवून महाविद्यालयात पहिला येण्याचा मान मिळविताना 95. 84 टक्के गुण मिळवून नवे रेकॉर्ड केले आहे. तर कोमल गोरे हिला पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय या विषयात 200 पैकी 200 आणि मंगेश मगर यांने उत्पादन व तंत्रज्ञान या विषयात 100 पैकी 100 गुण मिळविले आहेत. कृष्णा दिघ यानेे विज्ञान शाखेतील विद्यार्थी 90.92 टक्के गुण मिळवून दुसरा तर, संकेत शेळके या विद्यार्थ्याने 90. 76 टक्के गुण मिळवून तिसरा आणि मृणाल जोंधळे 90. 46 टक्के गुण मिळवून मुलींमध्ये पहिली आली आहे.


या विद्यार्थ्यांचे राज्याचे विरोधी पक्ष नेते व प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ना. राधाकृष्ण विखे , माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, जिल्हा परिषद अध्यक्षा ना. शालिनीताई विखे , प्रवरा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजयदादा विखे , संस्थेचे महासंचालक डॉ. सर्जेराव निमसे , मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे , सहसचिव श्री. भारत घोगरे, शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रा. शिवाजी रेठरेकर , प्रा. विजय आहेर, प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे, उप-प्राचार्य डॉ. रामचंद्र रसाळ , प्रा. दत्तात्रय थोरात, प्रा. छाया गलांडे आदींनी अभिनंदन केले.